त्रिवेणी संगम : येथे साडेसाती आणि ढैय्या या रूपात विराजित शनी महाराज

बुधवार, 20 मे 2020 (22:30 IST)
मध्यप्रदेशातील उज्जयिनी तशी तर दक्षिणेश्वर महाकाळ आणि दक्षिणेश्वरी देवी हरसिद्धी या नावाने जगप्रसिद्ध आहे. तरी ही शनी भक्तांसाठी हे स्थळ कोणत्या तीर्थ क्षेत्रापेक्षा कमी नाही. 
 
त्रिवेणीच्या संगमावर असलेले नवग्रह शनीचे देऊळ. या देउळात शनीदेव साडेसाती आणि अडीच वर्षाच्या( (ढैय्या)रूपात असे. तसेच नव्यापेठेत असलेल्या स्थावरेश्वर महादेवाच्या देवळात शनिदेवाचे निवास आहे. 
 
पौराणिक मान्यतेनुसार या देवळात शनीच्या पीडेमुळे व्याधीत असलेले बऱ्याच लांबून शनीच्या दर्शनाला येतात आणि त्रासापासून मुक्त होतात. 
 
अशी आख्यायिका आहे की शनीदेव भाविकांच्या पूजेने प्रसन्न होऊन भाविकांच्या कष्ट दूर करतात. ढैय्या किंवा साडेसाती असल्यास लाभ मिळतो. इंदूर मार्गावरील असलेले हे त्रिवेणी संगमावरील नवग्रहांचे देऊळ फार जुने आहे. येथे 150 फुटाच्या गर्भगृहात पूर्वीच्या भिंतीवर पश्चिमी दिशेला तोंड करून तीन मुरत्या आहेत. 
 
त्यापैकी पहिली मूर्ती गणपतीची, दुसरी साडेसाती शनिदेवांचीं आणि तिसरी मूर्ती अडीच वर्षाच्या(ढैयाच्या)शनी देवांची आहे. यांना शनीची दृष्टी किंवा ढैय्या शनी देव असे ही म्हणतात. या मूर्तींच्या वरील बाजूस मारुतीची मूर्ती देखील आहे.
 
गर्भगृहाच्या केंद्रात शनीदेव शिवलिंगाच्या रूपात आहे. ज्यावर भाविक तेलाने अभिषेक करतात. ढैय्या तसेच साडेसाती असणारे भाविक शनी देवांची कृपा मिळविण्यासाठी त्यांचा दर्शनास येतात. 
 
शनिश्चरी अवसेला त्रिवेणी संगमामध्ये अंघोळ करून शनी देवांचे दर्शन करण्याचे आपलेच महत्त्व आहे. शनिश्चरी अवसेला जगभरातील भाविक त्रिवेणी संगमेत स्नान करतात आणि तेथेच आपले कपडे आणि चपला सोडून देतात. याने दुर्भाग्य दूर होतं असे मानले गेले आहे. असे केल्याने सर्व कष्ट दूर होतात आणि शनीची कृपा दृष्टी राहते असे मानले गेले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती