बलराम याला संकर्षण नाव कसे पडले?

शनिवार, 16 मे 2020 (16:59 IST)
भगवान श्रीकृष्णाचे थोरले बंधू बलराम यांना बलदाऊ देखील म्हणतात. कृष्ण त्यांना दाउ म्हणायचे. ते कृष्णाचे थोरले बंधू होते. वासुदेवाच्या पहिल्या बायको रोहिणीच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता. श्रीकृष्णाचा जन्म वासुदेवांच्या दुसऱ्या बायको देवकीच्या पोटी झाला होता.
 
पौराणिक कथेनुसार भगवान शेषनाग देवकीच्या गर्भात सातव्या मुलाच्या रूपाने गेले. कंस या मुलाला देखील ठार मारणार होता. तेव्हा प्रभू श्रीकृष्णाने योगमायेला बोलावून म्हटले की आपण हे गर्भ रोहिणीच्या गर्भात ठेवून या.
 
श्रीकृष्णाच्या आदेशावरून योगमाया आपल्या मायेने देवकीच्या गर्भा रोहिणीच्या गर्भात ठेवते. देवकीच्या पोटातून गर्भ काढून रोहिणीच्या पोटात गर्भ ठेवण्याच्या या प्रक्रियेला संकर्षण असे म्हणतात. गर्भातून ओढल्या गेल्यामुळे त्यांचे नाव संकर्षण असे पडले.
 
लोकरंजनेमुळे राम म्हटले गेले आणि बळवान असल्यामुळे बलराम म्हणवले गेले. ते आपल्या जवळ नेहमीच एक नांगर ठेवायचे त्यामुळे त्यांना हलधर असे ही म्हणतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती