काय सांगता कृष्णावर चोरी आणि हत्येचा आरोप लागला होता...

बुधवार, 6 मे 2020 (17:45 IST)
आयुष्यात काहीवेळा अशी परिस्थिती येते ज्यावेळी माणसांचे परिस्थितीवर काही ही नियंत्रण नसते. अशी परिस्थिती माणसांवरच नव्हे तर देवावर सुद्धा येऊ शकते. श्रीकृष्णच्या स्थळी द्वारिकेमध्ये सुद्धा श्रीकृष्णांवरसुद्धा मोठं संकट आले होते. श्रीकृष्णांवर सुद्धा चोरीचे आणि हत्येचे आरोप लागले होते. 
 
ही गोष्ट सुरू होते ती कृष्णाच्या एक भक्तापासूनच. पण भक्ताची भक्तीच सर्व काही नसते. एकदा भक्तीला तडा गेला की मग भक्त तर देवाला सुद्धा सोडत नाही. 
 
ही कथा सुरू होते कृष्णाच्या सत्राजित नावाच्या एका भक्तापासून. सत्राजित नावाचा एक सूर्यभक्त असे. सूर्यदेव त्याचा भक्तीला प्रसन्न होऊन त्याला एक ओजस्वी मणी देतात. त्या मणीचे नावं स्यमंतक असे. या स्यमंतक मणीला आपल्या गळ्यात घालून तो मिरवत असे. एके दिवशी तो द्वारकेला जाऊन पोहोचतो. त्या मणीचा प्रकाश सर्वत्र पसरत होता. 
 
द्वारिकेच्या लोकांना वाटले की स्वयं सूर्य देवांचे द्वारिकेला आगमन झाले आहे. लवकरच ही बातमी की कृष्णाच्या भेटीला स्वयं सूर्यदेव आले आहे. असे समजतातच कृष्णाला हसू येतं. त्यांना ठाऊक असतं की द्वारिकेला कोण आले आहे. ते म्हणतात आपण ज्यांना सूर्यदेव समजत आहात ते सूर्यदेव नसून सत्राजित असे. त्याचा गळ्यात जे मणी आहे त्याचा प्रकाश सर्वत्र पसरत आहे. सत्राजितने मणी आपल्या घराच्या देऊळात स्थापित केले. त्या मणीचे वैशिष्ट्य असे की ती मणी दररोज आठ भार सोनं देत असे. त्यामुळे सत्राजित कडे संपन्नता असे. एके दिवशी कृष्ण त्याचा घराच्या समोरून जात असे. त्यांनी सत्राजितला सुचवले की ही मणी मथुरेचे महाराज उग्रसेन ह्यांना द्यावी. म्हणजे त्यांचा राज्यात पण संपन्नता येईल आणि प्रजा सुखी राहील. परंतु अती लोभेमुळे त्याने असे करण्यास नकार दिले. 
 
एके दिवशी सत्राजितचा लहान भाऊ प्रसेन ती मणी गळ्यात घालून घोड्यावरून शिकार करावयास जातो. तेथे प्रसेन आणि त्याचा घोडा एका सिंहाच्या हाती मरण पावतो. सिंह त्या मणीला घेऊन आपल्या गुहेत जातो. ऋक्षराज जाम्बवन्त ह्याची दृष्टी सिंहावर पडते जो मणी घेऊन आला असतो. जांबवंत सिंहाला ठार मारतात आणि त्याकडून ती मणी घेऊन आपल्या गुहेत येतात. 
 
इथे सत्राजित आपल्या भावाची आतुरतेने वाट बघत असतो. त्याला वाटते की कृष्णानेच त्याचा भावाला त्या मणीसाठी ठार मारले आहे आणि ती मणी चोरून नेली आहे. तशी दवंडी सत्राजित संपूर्ण शहरात पिटवतो. कृष्णावर असे मिथ्य आरोपही करतो. ही गोष्ट कृष्णा पर्यंत पोहचते. आपल्यावर लागलेल्या या आरोपाला चुकीचे ठरविण्यासाठी काही लोकांना आपल्यासोबत अरण्यात प्रसेनला शोधण्यासाठी घेऊन जातात. तेथे त्यांना सिंहाच्या पावलाचे खुणा दिसतात. काहीच अंतरावर त्यांना प्रसेन आणि त्याचा घोड्याचे प्रेत दिसते. त्यांना सर्व घडलेले लक्षात येते. 
 
थोड्या अंतरावर त्या सिंहाचे प्रेत बघतात त्याजवळ एका गुहा आढळते. गुहेत अंधार असल्यामुळे कोणीही त्यामध्ये जाण्याचे धाडस करीत नाही. बरोबरच्या लोकांना बाहेरच थांबवून कृष्ण स्वतःच त्या अंधारी गुहेत जातात. आत गेल्यावर त्यांना दिसते की काही लेकरं त्या मणी सोबत खेळतं असतं. त्यांना बघून ती लेकरं घाबरतात. आपले लेकरं एक अनोळखी माणसाला बघून घाबरली आहे. असे बघून जांबवंत कृष्णाला मारायला धावून येतात. कृष्णा आणि जाम्बवन्त यांच्यात युद्ध होतं आणि हे युद्ध जवळपास 28 दिवस चालतं राहतं. 
 
जांबवंताना लक्षात येते की हे कोणी साधारण माणूस नसे. ते कृष्णाच्या पायाशी लोटांगण घालू लागतात. कृष्ण त्यांना माफ करतात पण जांबवंताला स्वतःची चूक जाणवते आणि त्या चुकीचे प्रायश्चित्त म्हणून जांबवंत आपल्या मुलीचे लग्न कृष्णा सोबत लावून देतात आणि मणी देऊन त्यांची परत द्वारिकेला पाठवणी करतात. अशा प्रकारे जांबवंती कृष्णाची दुसरी बायको होते. 

इथे सत्राजितला सर्व घडलेले समजल्यावर स्वतःचीच लाज वाटू लागते. त्याला देखील ह्याचे प्रायश्चित्त करावेसे वाटू लागते. कृष्णाला ते मणी देतात आणि मणीसोबतच त्याची मुलगी सत्यभामांचे लग्नसुद्धा कृष्णाशी लावून देतात. मणी आपल्याला सूर्यदेव कडून मिळाली आहे ती आपल्या जवळच राहू द्या. असे म्हणून ते मणी परत सत्राजितला देतात आणि सत्यभामांशी लग्न करतात. अश्या प्रकारे सत्यभामा कृष्णाची तिसरी बायको होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती