दसर्‍याला आपण सेवन करता का विडा ?

शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019 (12:42 IST)
विजयादशमी अर्थातच दसरा सण देशभरात उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी काही परंपरा देखील निभावल्या जातात, त्यापैकी हनुमानाला विडा अर्पित करणे आणि विडा सेवन करणे एक आहे. हा सण मंगळवारी आल्यास  याचं महत्त्व अधिकच वाढतं.
 
कारण - विडा प्रेम आणि विजय याचे प्रतीक आहे. विडा या शब्दाचा अर्थ देखील महत्त्वपूर्ण आहे कारण यात कर्तव्य रूपात वाईट परिस्थितीवर चांगुलपणाने मात करणे असे देखील बघितलं जातं.
 
याच कारणामुळे दसर्‍याला रावण दहन केल्यानंतर विडा खाण्याची परंपरा आहे. या दिवशी विडा खाऊन लोकं असत्यावर सत्याच्या विजय झाल्याचा आनंद साजरा करतात. परंतू हा विडा रावण दहनापूर्वी हनुमानाला अर्पित केला  जातो. 
 
या दिवशी विडा खाण्याचं एक अजून कारण म्हणजे या दरम्यान हवामानात बदल होणे आहे. ज्यामुळे संक्रामक आजाराचा धोका वाढतो. अशात विडा आरोग्यासाठी योग्य ठरतो.
 
एक आणखी कारण हे देखील आहे की नवरात्रीमध्ये 9 दिवस उपवास केल्यामुळे पचन क्रिया प्रभावित होते. अशात विडा खाल्ल्याने भोजन पचण्यात मदत होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती