शरीराची मलिनता काढण्यासाठी उन्हाळ्यात प्या हे 5 डिटॉक्स ड्रिंक, जाणून घ्या रेसिपी

गुरूवार, 18 एप्रिल 2024 (12:05 IST)
Detox Water Recipe : उन्हाळ्याचे दिवस आले की शरीरात पाण्याची प्रमाण कमी होणे ही सामान्य गोष्ट आहे. अश्यावेळेस शरीराला हाइड्रेट ठेवणे आणि शरीराची मलिनता बाहेर काढण्यासाठी डिटॉक्स वॉटर एक चांगला पर्याय आहे. डिटॉक्स वॉटर केवळ शरिराला हाइड्रेट ठेवत नाही तर हे शरीरात असलेले  घटक टॉक्सिन्स देखील बाहेर काढण्यास मदत करतात. आज आम्ही तुम्हाला 5 प्रकारच्या डिटॉक्स वॉटर बद्दल सांगणार आहोत. ज्यांना तुम्ही घरी बनवू शकतात व शरीर आरोग्यदायी बनवू शकतात. 
 
1. लिंब आणि पुदीना डिटॉक्स वॉटर 
लिंब आणि पुदीना डिटॉक्स वॉटर सर्वात लोकप्रिय डिटॉक्स वॉटर पैकी एक आहे. हे शरीराला हाइड्रेट ठेवण्यासोबत पाचन क्रिया  देखील सुरळीत ठेवण्यास मदत करते. 
 
साहित्य  
1 लीटर पाणी 
1 लिंब कापलेला 
10-12 पुदिन्याचे पाने 
 
कृती 
एका जग मध्ये पाणी टाकावे. मग यामध्ये लिंबाचे तुकडे व पुदिन्याचे पाणी टाकावे. याला चांगल्या प्रकारे मिक्स करा आणि 30 मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवावे. तयार डिटॉक्स वॉटर दिवसभरात केव्हाही सेवन करू शकतात.  
 
2. काकडी आणि आले डिटॉक्स वॉटर 
काकडी आणि आले डिटॉक्स वॉटर शरीराला डिटॉक्सिफाई करण्यासोबत वजन कमी करण्यासाठी मदत करते. काकडीमध्ये असलेले पाणी शरीराला हाइड्रेट ठेवते तर आले मेटाबॉलिज्मला वाढवते 
 
साहित्य 
1 लीटर पाणी 
1 काकडी कापलेली 
1 आले किसलेले 
 
कृती 
एका जग मध्ये पाणी घ्यावे. यामध्ये काकडीचे तुकडे आणि किसलेले आले टाकावे. याला चांगले मिक्स करावे आणि  30 मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवावे.
 
3. सफरचंद आणि दालचीनी डिटॉक्स वॉटर 
सफरचंद आणि दालचीनी डिटॉक्स वॉटर ब्लड शुगरची लेव्हल नियंत्रीत ठेवायला मदत करते. सोबतच शरीरात असलेले बॅड कोलेस्ट्रॉल देखील कमी करण्यास मदत करते. 
 
साहित्य-
1 लीटर पाणी 
1 सफरचंद कापलेले 
1 दालचीनीची स्टिक 
 
कृती 
एक जग मध्ये पाणी टाकावे. यामध्ये सफरचंदाचे तुकडे आणि दालचीनी टाकावी. यांना चांगल्या प्रकारे मिक्स करावे आणि 30 मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवावे.
 
4. संत्री आणि बेरी डिटॉक्स वॉटर 
संत्री आणि बेरी डिटॉक्स वॉटर शरीराला व्हिटॅमिन C ने भरपूर ठेवतो. सोबतच  इम्यूनिटीला वाढवते.  
 
साहित्य 
1 लीटर पाणी 
1 संत्री कापलेले 
1 कप बेरीज (स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी)
 
कृती 
एका जग मध्ये पाणी घ्यावे. यामध्ये संत्रीचे तुकडे आणि बेरीज घालावे. याला चांगले मिक्स करावे. 30 मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवावे. तयार डिटॉक्स वॉटर दिवसभरात पिऊ शकतात. 
 
5. टरबूज आणि पुदीना डिटॉक्स वॉटर 
टरबूज आणि पुदीना डिटॉक्स वॉटर शरीराला थंड ठेवण्यासाठी मदत करते.  सोबतच शरीरात असलेले इलेक्ट्रोलाइट्स चे प्रमाण भरून काढते. 
 
साहित्य 
1 लीटर पाणी 
2 कप टरबूज कापलेले 
10-12 पुदिन्याचे पाने 
 
कृती 
एका जग मध्ये पाणी घ्यावे. यामध्ये टरबूज आणि पुदिन्याचे पाने टाकावे. 
हे चांगल्या प्रकारे मिक्स करून 30 मिनिटांसाठी फ्रिजमधये ठेवावे. तयार डिटॉक्स वॉटर दिवसभरात सेवन करू शकतात.  
 
डिटॉक्स वॉटर सेवन करतांना घायची काळजी 
डिटॉक्स वॉटरला जास्त प्रमाणात घेऊन नये. दिवसभरात 2-3 लीटर डिटॉक्स वॉटर पुष्कळ आहे. जर तुम्हाला काही आजार असले तर, हे सेवन करण्यापूर्वी डॉकटरांचा सल्ला घ्यावा. डिटॉक्स वॉटरला जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेऊ नये. 24 तासांच्या आतमध्ये हे सेवन करावे. डिटॉक्स वॉटरला गोड करण्यासाठी साखर किंवा मधाचा उपयोग करावा. डिटॉक्स वॉटर सोबत तुम्ही उन्हाळ्यात हाइड्रेट राहण्यासाठी नारळाचे पाणी, ताक, फळांचे ज्यूस आणि हर्बल टी देखील पिऊ शकतात.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती