Diwali 2020: कधी आहे दिवाळी, जाणून घ्या 10 महत्त्वाच्या गोष्टी

बुधवार, 23 सप्टेंबर 2020 (08:34 IST)
दिवाळी किंवा दीपावली हा हिंदू धर्माचा मुख्य सण आहे. हा सण 5 दिवसी साजरा केला जातो. वसुबारस ते भाऊबीज हा सण साजरा होतो. दिवाळी हा अंधाऱ्यावर प्रकाशाचा विजय दर्शविणारा सण आहे. दर वर्षी आश्विन महिन्याच्या अमावस्येला दिवाळीला लक्ष्मी पूजन करण्याची प्रथा आहे. वर्ष 2020 मध्ये दिवाळी यंदा 14 नोव्हेंबर 2020, शनिवारी साजरी होणार आहे. 
 
5 दिवसाचा हा उत्सव खालील प्रमाणे असणार -
 
1. 12 नोव्हेंबर 2020, गुरुवारच्या दिवशी, गोवतासा द्वादशी, वसु वारस
2. 13 नोव्हेंबर 2020, शुक्रवारी धनत्रयोदशी, धन्वंतरी त्रयोदशी, यम दीपदान, काळी चौदस किंवा रूप चतुर्दशी 
3. 14 नोव्हेंबर 2020, शनिवारी नरक चतुर्दशी, दिवाळी, महालक्ष्मी पूजन
4. 15 नोव्हेंबर 2020, रविवारी गोवर्धन पूजा, अन्नकूट
5. 16 नोव्हेंबर 2020, सोमवारी बलिप्रतिपदा, दीपावली पाडवा, यम द्वितीया, भाऊबीज 
 
चला जाणून घ्या 10 महत्त्वाच्या गोष्टी -
* लक्ष्मीपूजनाच्या वेळेस ऊस, कमळ गट्टा, हळकुंड, बिल्वपत्र, पंचामृत, गंगाजल, आसन, दागिने, गवऱ्या, शेंदूर, भोजपत्र या इतर घटकांचा वापर केला पाहिजे.
* देवी लक्ष्मीला फुलांमध्ये कमळ आणि गुलाब प्रिय आहे. फळांमध्ये श्रीफळ, सीताफळ, बोर, डाळिंब आणि शिंगाडे प्रिय आहे.
* सुवासात केवडा, गुलाब, चंदनाच्या अत्तराचा वापर पूजेमध्ये अवश्य करावा.
* धान्यात तांदूळ आणि मिठाईमध्ये घरात बनवलेली साजूक तुपाची बनलेली केसराची मिठाई किंवा शिरा नैवेद्यात ठेवावं.
* व्यावसायिक प्रतिष्ठानांची आणि त्या ठिकाणी गादीची देखील पूजा करावी.
* लक्ष्मी पूजन राती 12 वाजे पर्यंत करण्याचे महत्त्व आहे. 
* धनाच्या देवी लक्ष्मीला प्रसन्न करावयाचे असल्यास दिव्यासाठी गायीचे तूप, शेंगदाण्याचे तेल, किंवा तिळाच्या तेलाचा वापर केल्याने देवी आई प्रसन्न होते.
* रात्री 12 वाजता दिवाळी पूजा करून झाल्यावर चुन्यात किंवा गेरूत कापूस भिजवून जात्यावर, चुलीवर, पाट्यावर, आणि सुपल्यावर टिळा किंवा टिळक लावा.
* दिव्यावरची काजळी घरातील सर्वाने डोळ्यात लावावी. 
* दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता उठून कचरा फेकायला जाताना 'लक्ष्मी या' 'लक्ष्मी या' 'दारिद्र्य जा' 'दारिद्र्य जा' असे म्हणायची मान्यता आहे. या मुळे घरातील दारिद्र्य दूर होतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती