अधिक मासातील शुभ मुहूर्त जाणून घ्या

शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (09:12 IST)
वाहन खरेदी मुहूर्त: सप्टेंबरमध्ये 19, 20, 27, 28, 29 तारखेला तर ऑक्टोबरमध्ये 4, 10 आणि 11 या तारखा वाहन खरेदीसाठी शुभ असून या दिवशी वाहन खरेदी किंवा बुकिंग करता येऊ शकते.
 
दागिने खरेदी मुहूर्त: सप्टेंबरमध्ये 18, 19, 22, आणि 26 तारीख तसेच ऑक्टोबरमध्ये 2, 3, 7, 8 आणि 15 तारखेला दागिने खरेदी करू शकतात.
 
बोलणी करण्यासाठी मुहूर्त: सप्टेंबरमध्ये 18, 26 आणि ऑक्टोबरमध्ये 7 आणि 15 तारीख शुभ असून या दिवसात लग्नाची बोलणी किंवा साखरपुडा करता येऊ शकतो.
 
व्यावसायिक करारासाठी मुहूर्त: सप्टेंबरमध्ये 19, 21 आणि 27 तसेच ऑक्टोबरमध्ये 6 ही तारीख व्यावसायिक करारासाठी शुभ असल्याचे सांगितले गेले आहे.
 
इलेक्ट्रॉनिक आणि मशीनरी खरेदीसाठी मुहूर्त: सप्टेंबरमध्ये 19, 20, 27, 28, 29 तारीख तर ऑक्टोबरमध्ये 4, 10, 11 तारखेला खरेदी करता येईल. 
 
यज्ञ, हवनासाठी मुहूर्त: 26 सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये 1, 4, 6, 7, 9, 11, 17 या तारखा धार्मिक अनुष्ठानासाठी योग्य आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती