World Cup 2019: या प्रकारे सर्व सामने आपल्या मोबाइलवर पहा

30 मे 2019 पासून World Cup 2019 सुरू झालं आहे. 14 जुलै पर्यंत चालणाऱ्या या क्रिकेट वर्ल्ड कपची मेजवानी संयुक्तपणे इंग्लंड आणि वेल्स करत आहे. संपूर्ण स्पर्धेत एकूण 45 सामने खेळले जातील. या Cricket World Cup 2019 चा पहिला सामना मेजवान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. तर आता प्रश्न असा उठतो की या सामन्याचे थेट प्रसारण कधी, कुठे आणि कसे पाहता येईल? चला आम्ही आपल्याला ते सांगू.
 
Hotstar - क्रिकेट वर्ल्ड कपच्या अधिकृत प्रसारणाचा अधिकार स्टार स्पोर्ट्सकडे आहे आणि हॉट-स्टार अॅप देखील स्टारचे आहे. अशामध्ये आपण हॉट-स्टारवर सर्व लाइव्ह मॅच पाहू शकता, तथापि या अॅपवर आपल्याला 5 मिनिटं उशीरा प्रसारण दिसेल. आपण हे लाइव्ह पाहू इच्छित असाल तर यासाठी आपल्याला 299 रुपये खर्च करावे लागतील, त्याची वैधता 1 महिन्याची असेल. तिथेच 99 रुपयांत आपल्याला एक वर्षासाठी सब्स्क्रिप्शन मिळू शकतो. हा अॅप आपण Android फोनमध्ये Google Play Store वरून आणि iPhone मध्ये अॅप स्टोअर वरून मोफत डाउनलोड करू शकता.
 
Jio TV - आपण जिओ सिम कार्ड वापरल्यास जिओ टीव्ही अॅपवर देखील सामन्याला लाइव्ह बघू शकता, तथापि यासाठी आपल्या फोनमध्ये हॉट-स्टार अॅप असणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात जिओ आणि हॉट स्टार यांच्यात एक भागीदारी झाली आहे ज्या अंतर्गत जिओ वापरकर्त्यांना मोफतच हॉट-स्टार अॅपचा ऍक्सेस मिळेल. तर सर्व प्रथम आपल्या फोनमध्ये जिओ टीव्ही डाउनलोड करावे. यानंतर आपल्याला वर्ल्ड कप 2019 चा बॅनर दिसेल, ज्यावर क्लिक केल्यावर आपण थेट हॉट-स्टार अॅपवर पोहचाल.
 
ICC Cricket World Cup 2019 App - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) च्या अधिकृत अॅप ICC Cricket World Cup 2019 वर देखील आपण सर्व सामन्यांचा लाइव्ह अपडेट (स्कोअरकार्ड) पाहू शकता, तथापि यावर आपण लाइव्ह मॅच पाहू शकत नाही. परंतु सामन्या संबंधित व्हिडिओ आणि हायलाइट्स निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतील. आपण जर लाइव्ह मॅच पाहू इच्छित असाल तर हा अॅप आपल्यासाठी कामाचा नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती