काय सांगता धक्कादायक ! नागपूरच्या रुग्णालयात एका बेडवर कोरोनाचे दोन रुग्ण !

मंगळवार, 30 मार्च 2021 (21:34 IST)
महाराष्ट्रात कोव्हिडच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे चिंता वाढतच आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे रुग्णालयावर देखील दबाब आला आहे. राज्यातील प्रमुख शहर नागपुरातील एका रुग्णालयाचे फोटो व्हायरल झाले असून त्यामध्ये एका बेडवर कोरोनाचे दोन रुग्ण असल्याचे दिसून आले आहे. 
हा फोटो साथीच्या आजाराशी झुंज देत असलेल्या राज्याच्या आरोग्याच्या कटू सत्याला दर्शविणारा आहे.हा फोटो नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचा आहे. अशी स्थिती आहे की रुग्णांनी भरलेल्या या वॉर्डमध्ये बहुतेक पलंगावर एका ऐवजी दोन रुग्ण आहे.   
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, खासगी रुग्णालयाच्यापेक्षा शासकीय रुग्णालयात खर्च कमी लागत असल्यामुळे लोक शासकीय रुग्णालयात वळत आहेत. तसेच डॉक्टरांनी गंभीर रुग्णांना देखील या रुग्णालयात पाठवणी करत असल्याने स्थिती गंभीर झाली आहे. 
तथापि, रुग्णालयाचे उच्च अधिकारी सांगतात की, एका बेडवर दोन रुग्ण असलेल्या स्थितीला नियंत्रणात आणले आहेत. असं रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अविनाश गावंडे यांनी सांगितले. 
प्रोटोकॉलनुसार, शहराबाहेरील आणि शहराच्या मध्यभागातून आलेले कोविड चे गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जात आहे.
 ते म्हणाले, ' सध्या रुग्णालयात कामाचा ताण जास्त आहे.आम्ही बेडची संख्या वाढवत आहोत .आता स्थिती नियंत्रणात असून एका बेड वर आता एकच रुग्ण आहे' नागपूर शहरात सोमवारी 3100 नवीन कोरोनाच्या प्रकरणांची नोंद केली गेली आणि 55 लोक कोरोनामुळे मृत्युमुखी झाले. शहरात आता पर्यंत कोरोनाचे  2,21,997 प्रकरणे आढळले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती