दानशूर कोटक समूह, केले कोट्यवधींचे दान

शुक्रवार, 10 एप्रिल 2020 (08:37 IST)
कोटक महिंद्रा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय कोटक यांनीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फंडाला कोट्यवधींचं दान केलं आहे. उदय कोटक यांनी २०२०-२१ या आर्थिक वर्षात पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभर पगाराच्या स्वरूपात केवळ १ रुपया घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता उदय कोटक यांनी हा निर्णय घेतला आहे. उदय कोटक यांच्याशिवाय त्यांच्या समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही त्यांच्या पगारामध्ये १५ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कोटक महिंद्रा बँकेने गुरुवारी निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.

कोटक समूहाने कोरोना विषाणूला रोखण्यासाठी इतर प्रकारची मदत व सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती दिली आहे. कोटक महिंद्रा बँकेने पीएम केअर्स फंडात २५ कोटी रुपये देणगीच्या स्वरूपात दिले आहेत. तसेच महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दहा कोटी रुपये जमा केले आहेत. त्याचबरोबर उदय कोटकदेखील व्यक्तिगत स्वरूपात २५ कोटी रुपयांचं दान करणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती