महाराष्ट्रात आतापर्यंत ९७ जणांचा मृत्यू, करोनाग्रस्तांची संख्या १३६४ वर पोहचली

गुरूवार, 9 एप्रिल 2020 (22:26 IST)
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या १३६४ वर पोहचली असून करोनाची लागण झाल्याने ९७ जणांना मृत्यू झाला आहे. आज महाराष्ट्रात २२९ करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तसेच करोनामुळे आज दिवसभरात २५ जणांचा मृत्यू झाला. 
 
महाराष्ट्रात कुठे किती रुग्ण ही माहिती देखील मंत्रालयाकडून प्राप्त झाली आहे. त्याप्रमाणे खालील दिलेल्या शहरांमध्ये रुग्णांची संख्या या प्रकारे आहे-
मुंबई – ८७६, पुणे- १८१, पिंपरी चिंचवड-१९, पुणे ग्रामीण-६, ठाणे-२६ रुग्ण, कल्याण डोंबिवली-३२, नवी मुंबई-३१, मिरा भाईंदर-४, वसई विरार-११, पनवेल-६, ठाणे ग्रामीण, पालघर ग्रामीण- प्रत्येकी ३, सातारा-६, सांगली-२६, नागपूर-१९, अहमदनगर-१६, बुलढाणा-११, अहमदनगर ग्रामीण-९, औरंगाबाद-१६, लातूर-८, अकोला-९, मालेगाव-५, रत्नागिरी, यवतमाळ, उस्मानाबाद, अमरावती-४, कोल्हापूर-५, उल्हासनगर, नाशिक, नाशिक ग्रामीण जळगाव, जळगाव ग्रामीण, औरंगाबाद ग्रामीण, जालना, हिंगोली, वाशिम, गोंदिया, बीड, सिंधुदुर्ग या ठिकाणी प्रत्येकी १ रुग्ण, इतर राज्यातील-८ असे एकूण १३६४
 
दरम्यान १२५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती