नजिकच्या काळात करोनाची लस मिळेलचं याची शाश्वती नाही

शुक्रवार, 22 मे 2020 (16:08 IST)
कोरोनावर औषध शोधण्याचं कामही युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र, करोनावर लवकर लस मिळण्याची शक्यता मावळत चालली आहे. नजिकच्या काळात करोनाची लस मिळेलचं याची शाश्वती नाही, असा इशारा कॅन्सर आणि एचआयव्हीवर संशोधन करणाऱ्या अमेरिकेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ विलियम हेसलटाइन यांनी सांगीतल आहे.  
 
”करोनाचा मुकाबला करण्यासाठी नजिकच्या काळात लस तयार होण शक्य नाही. त्यामुळे लॉकडाउन उठवताना किंवा शिथिल करताना सर्वच देशांनी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध आणि स्वयं क्वारंटाइन या पद्धतीचा उपयोग करायला हवा,” असा सल्ला त्यांनी दिला.
 
“करोनावर लस तयार करण्यात आली, तरी मी त्यावर अवलंबून राहणार नाही. यापूर्वीही करोना विषाणूच्या इतर प्रकारच्या लसी तयार करण्यात आल्या. पण, या लसी जेथून विषाणू शरीरात प्रवेश करतात, त्या नाकातील विशिष्ट त्वचेचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचं निष्पन्न झालं आहे,” असं हेसलटाइन यांनी सांगितलं.
 
“लसीपेक्षाही इतर मार्गांनी करोनावर नियंत्रण मिळवता येईल. त्यासाठी नागरिकांनी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करायला हवं. तोंडाला मास्क लावायला हवा, हात धुवायला हवेत, सोशल डिस्टन्सिग पाळायला हवं आणि स्वयं क्वारंटाइन आदी गोष्टी करायला हव्यात,” असं आवाहन त्यांनी केलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती