राज्यात 27,918 नवे कोरोना रुग्ण दाखल, 139 मृत्यू

बुधवार, 31 मार्च 2021 (08:14 IST)
राज्यात मंगळवारी 27 हजार 918 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून, 139 मृत्यू झाले आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढली असून सध्या राज्यात 3 लाख 40 हजार 542 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 27 लाख 73 हजार 436 एवढी झाली असून, त्यापैकी 23 लाख 77 हजार 127 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर 23 हजार 820 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.71 टक्के एवढं झाले आहे.
 
राज्यात 139 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 54 हजार 422 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.96 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 16 लाख 56 हजार 697 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 17 हजार 649 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 1 कोटी 96 लाख 25 हजार 065 नमूने तपासण्यात आले आहेत.
 
देशातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण  दहा जिल्ह्यात आहेत. यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, नाशिक, नागपूर, बंगळुरू व दिल्लीचा समावेश आहे. देशात कोरोनाचे 807 युके, 47 दक्षिण आफ्रिका व एक ब्राझीलीयन प्रकार सापडल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती