नागपुरात कोरोना बाधितांची आकडेवारी काळजीत टाकण्यासारखी 33 कोरोना बाधित रुग्ण मृत्युमुखी

मंगळवार, 23 मार्च 2021 (21:06 IST)
कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत आहे. महाराष्ट्रात तर कोरोना ने कहरच केला आहे. दररोज कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. नागपुरात कोरोनाचा उद्रेग झाला असून आज 33 कोरोना बाधित रुग्ण मृत्युमुखी झाले. तर दिवस भरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 3095 नोंदली गेली आहे. 
सध्या ही कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता वर्तली जातआहे.  मुंबई,पुणे,नागपूर,नाशिक या शहरात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहे. कडक निर्बंध लावून देखील कोरोना झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकार देखील चिंतीत आहे. 
सध्या नागपुरात 3095 रुग्णांची नोंद झाली आहे. नागपूर जिल्ह्यात सध्या रुग्णांची संख्या 1 लाखाच्या वर गेली आहे.  सध्या सक्रिय प्रकरणे 31 हजार पेक्षा अधिक आहे त्यांच्या वर रुग्णालयात उपचार 
सुरु आहे. तर गेल्या 24 तासात 33 रुग्ण दगावले आहे. ते उपचाराधीन होते. आता पर्यंत कोरोनाने मृतकांचा आकडा पुन्हा  4697 एवढा झाला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती