आतापर्यंत कोरोनाच्या ३१ हजार ३३३ रुग्णांना घरी सोडले

बुधवार, 3 जून 2020 (09:28 IST)
राज्यात १२२५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३१ हजार ३३३  रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाच्या २२८७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३८ हजार ४९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.
 
पाठविण्यात आलेल्या ४ लाख ८३ हजार ८७५ नमुन्यांपैकी ७२ हजार ३०० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ७० हजार ४५३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ५३८ खाटा उपलब्ध असून सध्या ३५ हजार ०९७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यात १०३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद  झाली आहे.  नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे:  ठाणे- ७४ (मुंबई ४९, ठाणे १, नवी मुंबई ४, पनवेल ४, रायगड ६, मीरा भाईंदर- १०), नाशिक- २ (नाशिक १, अहमदनगर १), पुणे- २१ (पुणे १०, सोलापूर ५, सातारा ६), कोल्हापूर- ३ (सांगली ३) अकोला-३ (अकोला ३).

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती