मोदींनी सांगितला COVID-19 संक्रमण रोखण्याचा मंत्र, जाणून घ्या 10 महत्वाच्या गोष्टी

मंगळवार, 28 जुलै 2020 (10:01 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड -19 साथीच्या पार्श्वभूमीवर भारताने तयार केलेल्या आरोग्य स्त्रोतांच्या क्षमतेत अभूतपूर्व विस्तार असल्याचे सांगत सोमवारी म्हटले की योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे कोरोना विषाणूच्या बाबतीत भारताची स्थिती इतर देशांपेक्षा चांगली आहे. पंतप्रधानांनी ग्रामीण भागातील आरोग्य क्षमता अधिक सक्षम करण्यावर भर दिला ज्यामुळे खेड्यांमधील कोरोनाविरूद्धचा लढा कमकुवत होऊ नये, ते म्हणाले की भारतात दररोज पाच लाखांहून अधिक चाचण्या घेतल्या जातात, येणाऱ्या काळात त्या दर दिवसाला 10 लाख करण्याचे प्रयत्न असतील.
 
व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित कार्यक्रमात नोएडा, मुंबई, कोलकाता येथे उच्च-क्षमता असलेल्या कोविड -19 चाचणी सुविधांच्या शुभारंभानंतर पंतप्रधानांनी वरील गोष्टी सांगितल्या. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याव्यतिरिक्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील उपस्थित होत्या.
 
पंतप्रधान मोदींनी सांगितलेल्या मोठ्या गोष्टी-
 
- देशात ज्या प्रकारे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात आले, आज याचाच परिणाम म्हणजे इतर देशांपेक्षा भारत अधिक स्थिर स्थितीत आहे. आज आपल्या देशात कोरोनामुळे मृत्यू मोठ्या देशांपेक्षा खूपच कमी आहेत.
- देशात कोरोनामुळे ठीक होण्याचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत खूपच जास्त आहे, दिवसेंदिवस सुधारणादेखील होत आहेत. ते म्हणाले भारतात कोरोनामुळे संसर्ग झाल्यानंतर बरे होणार्‍या लोकांची संख्या सुमारे दहा लाखांवर पोहोचणार आहे.
कोरोनाविरूद्ध भारताचा लढा पाहून जग आश्चर्यचकित झाले आहे. पंतप्रधान म्हणाले की ही अत्याधुनिक तपासणी केंद्र सुरू झाल्याने पश्चिम बंगाल, महाराष्ट्र उत्तर प्रदेशला कोरोनाविरूद्धच्या लढाईत बळकटी मिळणार आहे.
– आता तिन्ही ठिकाणी कोरोना टेस्टची जी उपलब्ध क्षमता आहे, त्याच्यात 10,000 ची क्षमता जोडली जात आहे. यावेळी पंतप्रधानांनी ग्रामीण भागात आरोग्य संसाधने सक्षम करण्यावर भर दिला.
– आपल्याला एकत्र येऊन नवीन आरोग्य इन्फ्रा तयार करायचाच आहे, जे आपल्याकडे प्रत्येक खेड्यात सरकारी प्रायव्हेट डिस्पेंसरीज आहेत, दवाखाने आहेत त्यांना अधिक कार्यक्षम देखील करायचे आहे. हे आम्हाला यासाठी देखील करावे लागेल जेणेकरुन आपल्या खेड्यांमध्ये कोरोनाविरूद्धचा लढा कमकुवत होऊ नये.
– कोरोनाविरूद्धच्या या मोठ्या लढाईसाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरोग्याच्या पायाभूत सुविधांचा विकास देशात वेगवान झाला पाहिजे. हे लक्षात घेऊन भारताने आपल्या क्षमतांचा वेगवान गतीने विस्तार केला.
– जानेवारीत आपल्याकडे कोरोनाच्या तपासासाठी जिथे मात्र एकच केंद्र होते. आज देशभरात सुमारे 1300 प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आज भारतात दररोज पाच लाखाहून अधिक चाचण्या घेतल्या जात आहेत, येत्या आठवड्यांत दररोज दहा लाख करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
– कोरोना साथीच्या काळात प्रत्येकजण फक्त एका निर्धाराने व्यस्त असतो की प्रत्येक भारतीयाला वाचवायचे आहे. या संकल्पामुळे भारताला आश्चर्यकारक परिणाम मिळालेले आहेत, विशेषत: पीपीई किट्स, मास्क चाचणी किटसंदर्भात भारताने जे केले, ती यशाची एक मोठी यशोगाथा आहे.
– सहा महिन्यांपूर्वी देशात एकही पीपीई किट उत्पादक नव्हता तर आज 1200 हून अधिक उत्पादक दररोज पाच लाखाहून अधिक पीपीई किट बनवित आहेत. एकेकाळी भारत एन-95 मास्क देखील बाहेरून मागवत असे, तर आज भारतात दररोज तीन लाख एन-95 मास्क बनवले जात आहेत.
– कोरोना विरूद्ध लढण्यासाठी मानवी संसाधने तयार करणे हे एक मोठे आव्हान होते. प्रत्येकाच्या सामूहिक प्रयत्नांमुळे केवळ लोकांचे प्राण वाचवले जात नाहीत तर ज्या वस्तू देश आयात करत होता, आता त्यांची निर्यात भारत करणार आहे.
– आतापर्यंत खेडेगावांनी कोरोनाविरूद्ध चांगली कामगिरी केली आहे. आगामी उत्सव पाहता पंतप्रधानांनी जनतेला असा इशारा देखील दिला की जोपर्यंत कोरोनाविरुद्ध कोणतेही प्रभावी औषध किंवा लस येत नाही, तोपर्यंत मास्क, सोशल डिस्टेंसिंग, हात स्वच्छ धुणे हे बचावासाठी एकमेव पर्याय आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती