जगातले सर्वात स्वस्त कोरोना टेस्टिंग किट विकसित

गुरूवार, 16 जुलै 2020 (09:19 IST)
आता IIT Delhi ने जगात सर्वात स्वस्त असं कोरोना टेस्टिंग किट विकसित केलं आहे. या किटचं लाँचिंग  सकाळी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल आणि या खात्याचे राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं. खुद्द रमेश पोखरियाल निशंक यांनीच ही माहिती आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून दिली आहे.
 
रमेश पोखरियाल यांच्या हस्ते हे टेस्टिंग किट लाँच करण्यात आलं. Newtech Medical कंपनीकडे Corosure या नावाने हे टेस्टिंग किट लाँच करण्यात आलं आहे. या टेस्टिंग किटची संपूर्ण किंमत फक्त ६५० रुपये इतकी आहे. त्यामुळे सध्या जगभरात अस्तित्वात असलेल्या इतर चाचण्यांपेक्षा ही चाचणी स्वस्त आणि परवडणाऱ्या दरात होऊ शकणार आहे. ‘ही चाचणी स्वस्त झाल्यामुळे चाचण्या होण्याचं प्रमाण आणि चाचण्यांची किंमत यामध्ये खूप मोठा बदल घडणार आहे. या किटच्या मदतीने महिन्याला २० लाख चाचण्या करणं शक्य होणार आहे. तेही अगदी वाजवी दरामध्ये’, अशी प्रतिक्रिया यावेळी IIT Delhiचे संचालक व्ही. रामगोपाल राव यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती