राज्यात ७० हजारहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू

सोमवार, 29 जून 2020 (08:16 IST)
राज्यात रविवारी कोरोनाच्या ५४९३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७० हजार ६०७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. २३३० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ८६ हजार ५७५ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  ५२.५९ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
 
पाठविण्यात आलेल्या ९ लाख २३ हजार ५०२ नमुन्यांपैकी १ लाख ६४ हजार ६२६ नमुने पॉझिटिव्ह (१७.८२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ७० हजार  ४७५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ७५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यात १५६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ६० मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ९६ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.५१ टक्के एवढा आहे.
 
मागील ४८ तासात झालेले ६० मृत्यू हे मुंबई मनपा-२३, ठाणे मनपा-२,नाशिक-३, नाशिक मनपा-५, पुणे मनपा-२०, सोलापूर मनपा-४, सांगली-१, रत्नागिरी-१. या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती