२२ मार्चपासून आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानाला भारतात लँडिंग नाही

शुक्रवार, 20 मार्च 2020 (07:48 IST)
करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान सेवेसंदर्भात केंद्र सरकारने अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या २२ मार्चपासून म्हणजे रविवारपासून एकाही आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानाला भारतात लँडिंगची परवानगी दिली जाणार नाही.
 
६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरीक आणि १० वर्षाखालील मुलांनी घरातच रहावे, यासंदर्भात राज्य सरकारांनी निर्देश जारी करावेत अशी सूचना भारत सरकारने केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता खासगी क्षेत्राने आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा द्यावी असे सरकारने म्हटले आहे.
 
परदेशातून आलेल्या प्रवाशांमुळे भारतात करोना व्हायरसचा फैलाव झाला आहे. करोना व्हायरसचे सध्या देशभरात १५० पेक्षा जास्त रुग्ण असून आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती