लोक ऐकणार नसतील तर काही निर्बंध टप्प्याटप्प्याने घालावे लागतील : टोपे

बुधवार, 25 नोव्हेंबर 2020 (08:30 IST)
लॉकडाऊनबाबत अजून चर्चा किंवा निर्णय़ झाला नसल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. अनलॉक मोठ्या प्रमाणात केल्याने दुसरी लाट कदाचित येऊ शकते, पण ती किती मोठी असेल हे सांगता येत नाही. जनहिताचा दृष्टीने आपल्याला अनलॉक करावं लागलं, लोकांना विनंती आहे यासाठी जे नियम केलेत ते काटेकोरपणे पाळले पाहिजे. बाजारात गर्दी करून लोकं विना मास्क फिरत आहेत. असं देखील राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
 
'आपली संख्या वाढत असेल आणि लोक ऐकणार नसतील तर काही निर्बंध टप्प्याटप्प्याने घालावे लागतील. याबाबत नियम करण्याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर एक बैठक होईल आणि छोटे निर्बंध लावता येतील का याचा निर्णय घेऊ. पण लॉकडाऊन नसेल, कुणीही घाबरण्याचं कारण नाही.' राज्यात पुन्हा आपण टेस्ट वाढवतोय. त्यामुळे २ हजारावर आलेला आकडा ४ हजारवर गेलेला दिसतोय.' असं देखील टोपे यांनी म्हटलंय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती