कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर

शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020 (12:12 IST)
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा कहर (coronavirus) काही केल्या थांबत नाही. दिवसभरात आतापर्यंतची सर्वाधिक 29 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतल्याची नोंद करण्यात आली. त्यामुळे मृतांची एकूण संख्या 643 झाली आहे. चोवीस तासांत 771 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या 21 हजार 639 झाली आहे. मृतांत शहरातील 13 जणांचा समावेश आहे. दिलासादायक बाब म्हणजे, जिल्ह्यातील 373 जण कोरोनामुक्त झाले असून, आतापर्यंत जिल्ह्यातील 12 हजार 277 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
 
दिवसभरात kolhapur जिल्ह्यात 1 हजार 848 जणांची कोरोनाची प्राथिमक तपासणी झाली. त्यापैकी 1 हजार 703 आरटी-पीसीआरसाठी, तर 540 जणांचे स्वॅब अँटिजेन तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले असून, वाढत्या रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय क्षेत्र हडबडले आहे. 
 
कोरोनाबाधित रुग्णसंख्या (coronavirus) वाढू लागल्याने गंभीर रुग्णांना रुग्णालयात वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवून घेतले जात आहे. तर ज्या रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे; मात्र त्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत अशांना घरीच उपचार दिले जात आहेत. त्यांच्यावरदेखील दक्षता समिती आणि वैद्यकीय पथके लक्ष ठेवून आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती