भारतात 'या' औषधाच्या क्लिनिकल चाचण्या झाल्या सुरु

मंगळवार, 12 मे 2020 (16:29 IST)
अ‍ॅंटीव्हायरल ड्रग फॅव्हीपीरावीर या औषधाच्या क्लिनिकल चाचण्या भारतात सुरु झाल्या आहेत अशी माहिती ग्लेनमार्क फार्मास्यूटिकल्स लिमिटेडने मंगळवारी दिली. फॅव्हीपीरावीर हे करोना व्हायरसवर प्रभावी ठरणाऱ्या औषधांपैकी एक आहे. 
 
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने दिलेल्या परवानगीमुळे Covid-19 च्या रुग्णांवर औषधाची चाचणी घेण्याची परवानगी मिळालेली पहिली कंपनी ठरल्याचे ग्लेनमार्ककडून सांगण्यात आले. जपानमधील फुजीफिल्म होल्डींग कॉर्पोरेशन एविगन या ब्रॅण्डनेमखाली फॅव्हीपीरावीर या औषधाची निर्मिती करते. जपानमध्ये ताप, सर्दीवर असलेल्या फॅव्हीपीरावीर या औषधाचा वापर करण्याची २०१४ मध्ये परवानगी देण्यात आली.
 
“भारतात फॅव्हीपीरावीर औषधाच्या चाचण्या सुरु झाल्या आहेत. दहा किंवा त्यापेक्षा जास्त सरकारी-खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांवर या चाचण्या घेण्यात येतील. जुलै-ऑगस्टपर्यंत या चाचण्यांचे निष्कर्ष समोर येतील” असे ग्लेनमार्ककडून सांगण्यात आले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती