कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने घट

मंगळवार, 15 जून 2021 (11:02 IST)
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होतांना दिसतोय. यासह दिलासादायक बाब म्हणजे सातत्याने कोरोना बाधितांमध्ये घट होत असून  सोमवारी सलग चौथ्या दिवशी कोरोना बाधितांची संख्या घटली आहे.  राज्यात ८ हजारांहून अधिक नव्या रूग्णांचे निदान झाले असून २०० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत ५९ लाख १७ हजार ३५४ रूग्ण बाधित आहेत तर आतापर्यंत मृतांचा आकडा हा १ लाख १२ हजार ६९६ वर पोहोचला आहे.
 
दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासात १४ हजार ७३२ कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत ५६ लाख ५४ हजार ३ रूग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.५५ टक्के एवढे झाले आहे. . तसेच आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,८२,१५,४९२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,१७,१२१ (१५.४८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,४९,२५१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,९९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती