चांगली बातमी, कोरोना संसर्गाचा उपचाराचा सर्व खर्च आता आयुष्यमान योजनेत होऊ शकणार

मंगळवार, 24 मार्च 2020 (19:54 IST)
नवी दिल्ली : कोरोना विषाणूंच्या संसर्गाची तपासणी व उपचार खर्च सरकारी आरोग्य विमा योजना आयुष्मान भारत यांचा पक्षात लवकरच जाहीर केला जाऊ शकतो. 
 
ही माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. त्यांनी सांगितले की आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (पीएमजेवाय) चालविणाऱ्या "राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने" कोरोना विषाणूंच्या संसर्गाची चाचणी व उपचार खर्च या योजनेच्या पक्षात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्राधिकरणाच्या नियामक मंडळ (प्रशासकीय मंडळ) कडून परवानगी घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 
 
त्यांचा म्हण्यानुसार खाजगी रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यास सरकारची परवानगी मिळाल्यावर रुग्णांची चाचणी व उपचाराचा खर्च आयुष्यमान भारत योजनेच्या आरोग्य विमा पॅकेजमध्ये समाविष्ट केला जाईल. त्याचा अंमलबजावणीमुळे कोरोना संसर्गाची तपासणी खाजगी प्रयोगशाळांमध्ये केली जाऊ शकते 
आणि विमा योजनेत सूचीबद्ध असलेल्या खाजगी रुग्णालयात अलगाव प्रभागात (आयसोलेशन वार्ड) उपचार केले जाऊ शकतात. 
 
हे लक्षात घेण्यासारखे आहे की देशातील 10.74 कोटी गरीब कुटुंबाना पीएमजेवायच्या आरोग्य विमे योजनेत समाविष्ट असलेल्या रोगांच्या मोफत उपचारांसाठी प्रत्येक विमा घेतलेल्या कुटुंबाला वर्षकाठी 5 लक्ष्य रुपयांची वैद्यकीय सुविधा मिळते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती