ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आयसीयूमध्ये

मंगळवार, 7 एप्रिल 2020 (10:39 IST)
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना गेल्या आठवड्यात कोरोना लागण झाल्याचं समोर आलं होतं. स्वतःच विलगीकरण केल्यानंतरही जॉन्सन यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यानं सोमवारी त्यांना रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच जॉन्सन यांची प्रकृती आणखी खालावली आहे. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं आहे.
 
याआधी २७ मार्च रोजी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यांनी स्वतः फेसबुकवरून याची माहिती दिली होती.
 
करोनाचा संसर्ग झाल्यानंतर पंतप्रधान जॉन्सन यांनी स्वतःला विलग करून घेतलं होत. तेथूनच ते संपूर्ण काम बघत होते. मात्र, ताप कमी होत नसल्यानं त्यांना रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. ६ एप्रिल रोजी त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यानंतर उपचार सुरू असताना जॉन्सन यांच्या प्रकृतीत आणखी बिघाड झाली. त्यामुळे त्यांना तातडीनं अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं आहे. जॉन्सन यांच्यावर सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती