महाराष्ट्रात कोरोनाचा 'कमबॅक', मात्र माननीयांचे 'हम नही सुधरेंगे '!

मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (18:27 IST)
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे सरासरी ४६०० प्रकरणे दररोज येत आहे. २२ फेब्रुवारी रोजीच राज्यात ५००० पेक्षा अधिक केसेस नोंदविल्या आहेत. दुसरीकडे, राज्याचे 'आदरणीय' लोक लग्नाच्या मेजवानी झोडत आहे आणि काही लोक गर्दी जमविण्यात मागे पडत नाही. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक शब्दात लॉकडाऊन लावण्याचा इशारा दिला आहे. यवतमाळ आणि अमरावती मध्येही लॉक डाऊन लागू करण्यात आले आहे. 
कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे राज्यात मंगळवार पासून मोठ्या राजकीय सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी घातली जात आहे. पोलिसांना देखील अशा लोकांवर दंड आकारण्यास सांगण्यात आले आहे जे मास्क शिवाय रस्त्यावर दिसत आहे. ही माहिती स्वतः मुंबई पोलीस आयुक्त परमवीरसिंह यांनी ट्विटद्वारे दिली.
 
बोर्डाची परीक्षा ऑफलाईन : दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खोट्या बातम्या आणि अफवा पसरविणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्याच बरोबर सरकार ने दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे.
तथापि, राज्यात भव्य विवाह सोहळे आणि मेजवान्या होताना दिसून येत आहे. दरम्यान,राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांचा कोरोना अहवाल देखील सकारात्मक आला आहे.
 
मंत्री महोदयच बसवत आहे नियम धाब्यावर:
महाराष्ट्राचे मंत्री संजय राठोड यांनी कोरोना मार्गदर्शक तत्त्वांना आपल्या समर्थकांची गर्दी जमवून सार्वजनिक पणे पायमल्लीत केले. नुकत्याच एका युवतीच्या मृत्यूमुळे या मंत्र्यांचे नाव देखील चर्चेत आले आहे. वस्तुतः महाराष्ट्राचे वनमंत्री राठोड मंगळवारी वाशिम जिल्ह्यात असलेल्या पोहरादेवीच्या मंदिरात गेले.
राठोड यवतमाळ येथील निवासस्थानापासून रस्त्याने शेजारच्या वाशिम जिल्ह्यात गेले.हे मंदिर बंजारा समाजासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि राठोड हे या समाजाचे आहे. मंदिरात मोठ्या संख्येत मंत्री समर्थक उपस्थित होते.शिवसेना नेते राठोड हे त्यांच्या मूळ जिल्हा यवतमाळचे प्रभारी मंत्री आहे. 
 
महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी सर्वांना जवाबदारीची जाणीव करून दिली. ते म्हणाले की ते आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करीत आहेत . ते म्हणाले - कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाला बघता आणि माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहन बघता मी माझे सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. तथापि, नुकतेच पवार एका विवाह सोहळ्यात देखील दिसले.
 
निर्बंध सुरू: अमरावती विभागातील इतर चार जिल्हे अकोला,वाशिम,बुलढाणा आणि यवतमाळ येथेही काही निर्बंध घातले आहेत. येथे आवश्यक दुकाने वगळता सर्व दुकाने, सरकारी आणि खाजगी शैक्षणिक संस्था बंद राहतील. लोकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतच वस्तू खरेदी करण्यास परवानगी दिली जाईल. २२ फेब्रुवारी पासून अमरावतीतही लॉकडाऊन सुरू झाले आहे. हे १ मार्च रोजी सकाळी आठ वाजे पर्यंत सुरू राहणार आहे.       
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती