राज्यात ५ हजार २१० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (09:43 IST)
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचीत घट झाली आहे. राज्यात ५ हजार २१० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून १८ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २१ लाख ६ हजार ९४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५१ हजार ८०६ जणांचा मृत्यू झाला आहे.
 
दिवसभरात राज्यात ५ हजार ३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख ९९ हजार ९८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.९६ टक्के एवढे झाले आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर २.४६ टक्के एवढा आहे.
 
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५७ लाख ९३ हजार ४२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख ६ हजार ९४ (१३.३४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख २४ हजार ५४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १ हजार ८९१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच सध्या ५३ हजार ११३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती