कोरोना व्हायरस कदाचित कधीच संपणार नाही, जगाला यासोबत जगण्याची सवय लावावी लागेल- डब्लूएचओ

गुरूवार, 14 मे 2020 (16:08 IST)
जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) आणीबाणी कार्यक्रमाचे प्रमुख डॉ माईक रेयान म्हणाले की, कोरोना व्हायरस कदाचित कधीच संपणाह नाही. जगाने यासोबतच जगायला शिकले पाहिजे. ते म्हणाले की एचआयव्ही देखील अद्याप संपला नाही, परंतु आपण त्याच्याबरोबर जगत आहोत.
 
रेयान म्हणाले की, “मी या दोन आजारांची तुलना करीत नाही, परंतु आपणास वास्तव समजले पाहिजे. कोरोना कधीपर्यंत संपुष्टात येईल याचा कोणताही अंदाज लावता येत नाहीय”
डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे की, संसर्गाची नवीन प्रकरणे येत आहेत. अशा परिस्थितीत लॉकडाउन काढून टाकल्यास रोग पुन्हा पसरू शकेल. पुन्हा लॉकडाऊन करण्याची शक्यता येऊ शकते. जेव्हा नवीन प्रकरणांचा दर खालच्या स्तरावर येईल आणि बहुतांश संक्रमित बरे होतील तेव्हाच लॉकडाउन काढवा. अशा परिस्थितीत आपण प्रतिबंध काढून टाकल्यास संसर्ग होण्याचा धोका कमी होईल. संसर्ग जास्त असताना आपण निर्बंध दूर केल्यास, कोरोना झपाट्याने पसरू शकतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती