अक्षय कुमारची मुलगी मेकअप आर्टिस्ट बनली, आई ट्विंकलचे मेकअप केले

गुरूवार, 14 मे 2020 (13:50 IST)
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाची मुलं प्रसिद्धीपासून दूर आहेत. दोन्ही अभिनेतेसुद्धा क्वचितच सोशल मीडियावर आपल्या मुलांचे फोटो शेअर करतात. लॉकडाऊनच्या दरम्यान आता ट्विंकलच्या मुलीने तिचा मेकअप केला आहे, ज्यामुळे तुमच्या चेहर्‍यावर देखील हसू येईल. तिचा फोटो शेअर करताना ट्विंकलने लिहिले की, "मुलीने माझे अद्भुत मेकओवर केला आहे."  
 
फोटोमध्ये ट्विंकलची स्माइलवरून कळत आहे की तिला आपल्या मुलीचे मेकओव्हर किती आवडले. 
 
यापूर्वी प्रियंका चोप्राच्या पुतणीने केला होता तिचा मेकअप ... 
 
लॉकडाऊनमुळे प्रत्येकजण त्यांच्या घरात बंद आहे, तर यादरम्यान प्रत्येकजण आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. प्रियंका चोप्रा सध्या आपल्या कुटुंबासह लॉस एंजेलिसमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी प्रियंकाने आपल्या पुतणीसोबत काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये तुम्हाला दिसेल की प्रियांकाची पुतणी आधी तिला क्राउन परिधान करते आणि नंतर तिचा मेकअप करते.   
 
 मेकअपनंतर प्रियंकाने ज्या पद्धतीने पोझ दिला तो खूप गोंडस आहे. प्रियांकाचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले. प्रियंकाने हे फोटो शेअर करत लिहिले आहे, सुंदर राजकुमारी.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती