रिअल इस्टेट क्षेत्रातील महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी "रेमी"चा नवा उपक्रम

गुरूवार, 22 मार्च 2018 (12:47 IST)
आजच्या आधुनिक युगात आपण पुरुषांच्या बरोबरीनेच महिलांना अनेक क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करताना पाहतो. घर, जबाबदाऱ्या आणि आपली कर्तव्य सांभाळत महिला आपल्या करिअरविषयीही फार जागरूक झाल्या आहेत. पोलिस, वैमानिक, सैनिक, राजकारणी, अभिनेत्री, कार्पोरेट वर्ल्ड असो महिला यातील अनेक क्षेत्रात आघाडी करीत आहेत. महिला आपल्या कर्तृत्वाचा ठसा या क्षेत्रांबरोबरच रिअल इस्टेट क्षेत्रातही उमटवत आहेत. या क्षेत्रातील करिअरसाठी महिलांना विचार करण्यास हरकत नाही. रेमी (द रिअल इस्टेट मॅनेजमेंट इन्स्टिट्युट) या संस्थेने महिलांना केंद्रित त्यांच्यासाठीरेमी रायझर्स नावाच्या शैक्षणिक उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमाअतंर्गत क्युरेटेड उद्योग आणि कौशल्य कार्यक्रमांद्वारे महिलांचा या कार्यक्षेत्रातील सहभाग वाढविणे हा उद्देश रेमीचा आहे. महिलांना या शिक्षण संस्थेतून पुढील गोष्टी शिकवण्यात येणार आहेत. या गोष्टी म्हणजे एलडब्लूएस आणि ईडब्ल्यूएस या क्षेत्रातील एक सघन कार्यक्रम आखून त्याद्वारे महिलांचा ब्रोकर क्षेत्रातील त्यांचा रस निर्माण करणे, तसेच त्यांना रेरापात्र रिअल इस्टेट ब्रोकर बनण्यासाठी मार्ग उपलब्ध करून देणे, महिलांना वस्तू विषयक ज्ञान देण्यासाठी त्यांच्यासाठी एक कार्यशाळा आखून त्यात त्यांना वास्तूविषयक मार्गदर्शन करणे, घराच्या डिझयिंगविषयी माहिती देण्यासाठी आर्कीटेक्श्चर तज्ज्ञांची कार्यशाळा आयोजित करून त्यांना घरातल्या आर्किटेश्चर विषयी माहिती देणे, सर्व सामान्यपणे घर खरेदी करतेवेळी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांविषयी एक चर्चासत्र आयोजित केले जाते. जेणेकरून महिलांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची माहिती असावी, महिलांना व्यवस्थापन क्षेत्रातील अनेक सुविधा मिळाव्यात यासाठी एक कार्यक्रम आखणे.
 
"या क्षेत्रातील महिलांचा प्रभाव वाढावा यासाठी आम्ही अनेक उपक्रम राबवले आहेत, या उपक्रमाअंतर्गत आम्ही स्त्रियांचे सामाजिक तसेच आर्थिक कौशल्यन निर्माण करण्यासाठीचे तसेच त्यांना या क्षेत्रातील विविध व्यासायिक संधी देण्याचे आमचे ध्येय आहे. आपल्या अर्थव्यवस्थेत रोजगार म्हणून रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये महिलांचा भाग असणे आवश्यक आहे.", असे रेमी या संस्थेच्या संचालिका शुभिखा बिल्खा यांनी या शैक्षणिक उपक्रमाबाबत माहिती देताना सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती