सुनिल शेट्टी म्हणुन आहे नाराज ...

गुरूवार, 8 ऑगस्ट 2019 (08:48 IST)
बॉलिवूडमध्ये अलिकडे कोणता ना कोणता स्टारकिड पदार्पण करत आहे. ज्यात सुहाना खान, आर्यन खान, अनन्या पांडे यांसारखे स्टारकिड्‌स बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. यात आणखीन एकाची भर पडली असून अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी सुद्धा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास तयार आहे. दिग्दर्शक साजिद नाडियावाला अहानला “आरएक्‍स 100’या तेलुगू ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या रिमेकमध्ये लॉंच करणार आहेत.
 
या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी उशीर होत असल्याने अभिनेता सुनील शेट्टी नाराज असल्याचे समजते. या चित्रपटाचे चित्रणीकरण या वर्षी जूनमध्ये सुरू होणार होते. परंतु ऑगस्ट महिना आला तरी चित्रणीकरण अद्यापही सुरू झाले नाही आणि यामुळे सुनील शेट्टी स्वत: हा चित्रपटाची कमान हाती घेणार असल्याची चर्चा आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती