करण जोहरच्या पार्टीत सेलिब्रिटींनी ड्रग्ज घेतल्याचा आरोप

गुरूवार, 1 ऑगस्ट 2019 (11:51 IST)
बॉलीवुडमधील दिग्दर्शक करण जोहरने दिलेल्या एका पार्टीवरून आता चांगलंच राजकारण रंगलं आहे. दीपिका पदुकोण, रणबिर कपूर, विकी कौशल, अर्जून कपूर, मलाइका अरोरा, शाहीद कपूर, चित्रपट निर्माते अयान मुखर्जीसारखे सिनेसृष्टीतील तारे-तारका उपस्थित असलेल्या या पार्टीचा व्हीडिओ करण जोहरने सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता.
 
या व्हीडिओमध्ये सर्व सेलिब्रिटी ड्रग्जच्या नशेत आहेत, असे ट्वीट शिरोमणी अकाली दलाचे आमदार मजिंदर सिरसा यांनी केले. त्यामुळे निर्माण झालेल्या वादात काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनीही उडी घेतली आहे.
त्यामुळे हे प्रकरण वाढण्याची शक्यता दिसत आहे. सिरसा यांच्या ट्विटला देवरा यांनी ट्वीटरवरून उत्तर देऊन माफी मागा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
 
देवरा यांनी "माझी पत्नीही या पार्टीत आणि व्हीडीओत आहे. तिथं कुणीही ड्रग्ज घतलं नव्हतं. आपल्याला माहिती नसलेल्या लोकांबद्दल असत्य माहिती पसरवणे थांबवा. तुम्ही स्वतः बिनशर्त माफी मागाल ही अपेक्षा" असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती