गायक विशाल ददलानीला २० लाखांचा दंड

गुरूवार, 2 मे 2019 (09:59 IST)
जैन मुनी तरूण सागर यांच्या विरोधात ट्विट केल्यामुळे गायक विशाल ददलानी आणि राजकिय कार्यकर्ता तहसीन पुनावाला यांच्या न्यायालयाने २० लाखांचा दंड ठोठावला आहे. पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने हा दंड त्यांना ठोठावला आहे. विशाल ददलानी आणि पुनावाला यांनी प्रसिध्दी मिळवण्यासाठी हे ट्वीट केल्याचं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. या दोघांनी धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी त्यांना प्रत्येकी १०-१० लाखांचा दंड ठोठावला आहे. सोशलमिडीयावर आजपर्यंत अशा धार्मिक भावना दुखवणाऱ्या पोस्ट केल्यामुळे देशामध्ये अनेकवेळा हिंसक वळण घेतलं आहे. यामुळे सार्वजनिक संपत्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे या दोघांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
 
विशाल ददलानी आणि पूनावाला यांनी जैन मुनी तरूण सागर यांच्या भाषणाची खिल्ली उडवली होती. हरियाणा विधानसभेत २६ ऑगस्ट २०१६ जैन मुनी यांचे भाषण झाले होते. त्यांना मनोहर लाल खटट्र सरकारने विधानसभेला संबोधीत करण्यासाठी बोलवले होते. या कार्यक्रमानंतर विशाल आणि पूनावाला यांनी जैन मुनी यांच्याविरोधात ट्विट केले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती