अनुष्काचा वाढदिवस खास बनवण्यासाठी विराट ने बनवला स्पेशल प्लान!

बुधवार, 1 मे 2019 (12:47 IST)
बॉलीवूड एक्ट्रेस अनुष्का शर्मा आज आपला 31वा वाढदिवस साजरा करत आहे. अशात पती विराट कोहलीने अनुष्काचा वाढदिवस खास बनवण्यासाठी बरेच प्लान बनवले आहे. मीडिया रिपोर्टनुसार विराटने अनुष्काच्या वाढदिवसाप्रसंगी तिच्यासोबत बंगळूरमध्ये एक प्रायवेट डिनर (private dinner) प्लान केला आहे. एवढंच नव्हे तर विराट आजचा पूर्ण दिवस अनुष्कासोबत घालवणार असून अनुष्काच्या आवडीची डिश देखील खाणार आहे.
 
बेवसाइट लेटेस्लीने दिलेल्या सूत्रानुसार विराटने अनुष्कासाठी खास डिनर प्लान केला आहे. या डिनर वेन्यूवर फक्त अनुष्का आणि विराटच उपस्थित राहणार आहे आणि त्यांच्यासाठी खास पक्वान्न बनवण्यात येतील. रिपोर्टनुसार विराटने हा निर्णय आपल्या पॉपुलॅरिटी आणि मीडियाशी वाचण्यासाठी केला आहे. ज्याने तो अनुष्का बरोबर वाढदिवसाच्या दिवशी शांतीने वेळ घालवू शकेल.
 
सांगायचे म्हणजे अनुष्का आणि विराटने 11 डिसेंबर, 2017 रोजी इटली (Italy)मध्ये गुपचुपरीत्या लग्न केले होते आणि ही बातमी कळताच त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता.
 
अनुष्का शर्माने आपल्या लहानशा करियरमध्ये बरेच काही मिळवले आहे. आपल्या फिल्मी करियरमध्ये अनुष्का शर्माने बर्‍याच प्रकारच्या वेग वेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. बरेच अवॉर्डास ही मिळवले आहे आणि वादांमुळे चर्चेत ही राहिली आहे. पण नुकतेच झालेले जीरोने तिनी सर्वांना निराश केले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती