जान्हवी कपूर यांच्या घरातील आणखी दोन व्यक्ती करोना पॉझिटीव्ह

शुक्रवार, 22 मे 2020 (12:19 IST)
निर्माते बोनी कपूर यांच्या घरातील आणखी दोन व्यक्तींची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया पोस्टद्वारे बोनी कपूर यांनी त्यांच्या घरात काम करणाऱ्या एका व्यक्तीची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याची माहिती दिली होती. त्यानंतर घरातील इतर सदस्यांची करोना चाचणी करण्यात आली. आता या चाचणीचे रिपोर्ट्स समोर आले असून घरात काम करणाऱ्या आणखी दोन व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. 
 
सध्या बोनी कपूर आणि त्यांच्या दोन्ही मुली जान्हवी कपूर आणि खुशी कपूर हे स्वत: क्वारंटाइन झालेले आहेत. तसेच घरातील सर्व सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती