Corona Positive लोकांबद्दल सकारात्मक व्यवहार असावा

गुरूवार, 21 मे 2020 (12:19 IST)
- डॉ . दीपा मनीष व्यास 
एका विषाणूने जगभरात थैमान मांडला आहे. या आजाराच्या दुष्प्रभावामुळे सर्वकाही विनाशाकडे चालले आहे. एकीकडे भारताची अर्थव्यवस्था कोलमडून जात आहे तेथे समाज देखील. आपल्याला ठाऊक आहे की या संकटाला आपापल्या घरी राहून एकत्र रूपाने तोंड द्यायचे आहे. आपला स्वभाव एकमेकांना समजून घेण्याचा आहे. सर्वांची मदत करण्यास आपण सज्ज आहोत. सर्वेच आपले आहेत. कोणीही परके नाही. अश्या भावनेने आपण वागत असतो. 
 
जर आपल्या घराच्या जवळ, गल्ली मध्ये, कॉलोनी मध्ये, परिसरात, कोणी कोरोनाने झपाटलेले आपल्याच ओळखीतले असे कोणी आल्यावर त्यांना धुडकुन लावू नका .त्यांना चांगली वागणूक द्या. हे अशे वागणे भीतीपोटी असू शकेल. मान्य आहे की भीती बाळगायला हवी. त्याच भीतीने आपल्याला सामाजिक अंतर राखून चालायचे आहेत. पण एकमेकांना गरज पडल्यास पाठिंबा देखील द्यायचा आहे.
 
सध्याचा काळात आपण ऐकत आहोत, बघत आहोत की जर एखादे कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह आले असल्यास त्या कुटुंबाशी सगळे जवळपासचे राहणारे दुर्व्यवहार करतात. त्यांचा द्वेष करायला लागतात. खरं तर त्यावेळी त्यांना आपल्या सहानुभूतीची नव्हे, आपल्या द्वेषाची नव्हे तर आपल्या आपुलकीची आणि आपल्या पाठिंब्याची गरज असते. जे आपण एका विशेष अंतर राखून देखील देऊ शकता. कमीत कमी असे व्यवहार करू नये की त्यांना स्वतःपासूनच भीती वाटू लागेल. किंवा एवढ्या मोठ्या आजाराशी लढून आणि जिंकून आल्यावर त्यांना स्वतःला हरल्या सारखे वाटू लागेल. 
 
अलीकडे अश्या बऱ्याच घटना उघडकीस आल्या आहेत की त्या सर्व कुटुंबाने कोरोनाला लढा देऊन विजय मिळवली असून देखील आपल्या माणसांनी त्यांना हरवून दिले आहेत. त्यांना पूर्णपणे वेगळी वागणूक मिळत आहे. दूधवाला दूध देत नाही, भाजीवाले त्यांना भाजी देत नाही, वाणी देखील त्यांना किराण्याचे सामान देत नाही, एवढेच नव्हे तर कचरा नेणारे देखील त्यांचा घरातील कचरा नेत नाही. 
 
या आधीच ते या आजाराच्या तणावाखालून निघाले आहे. त्यांना एकटेपणा जाणवत आहे. अशाने ते फार खचून गेले आहेत. आम्ही त्यांना मदत करण्याऐवजी असहाय असल्याची जाणीव करून देत आहोत. 
 
काही कुटुंब तर असे आहे की ज्यांच्या काही सदस्यांनाच क्वारंटाईन केले आहे आणि काही सदस्य ज्यामध्ये लहान मुळे, आबाळ वृद्ध घरातच आहे. काही ठिकाणी त्यांना जवळपासच्या लोकांची पुरेपूर मदत मिळत आहे. आपल्यापणाची जाणीव करून देत आहेत. पण काही काही ठिकाणी ते असहाय आणि एकटे पडले आहे. आपली ही संस्कृती तर नव्हे. किमान आपण त्यांना मानसिक आधार तर देऊच शकतो. 
 
हा एका आजार आहे जो फक्त एकमेकांच्या धैर्याने आणि हिमतीने जिंकू शकतो. जे लोकं या भयानक आजारात पॉझिटिव्ह आले आहे त्यांना आपण नकारात्मक वागणूक देऊ नका. रुग्णाला जो पर्यंत मानसिक शांती मिळणार नाही तो पर्यंत तो आपली रोग प्रतिरोधक क्षमता वाढवू शकणार नाही. त्याची मन:स्थितीला समजून त्याची मदत करा. अद्याप या आजारावर कुठलेही ठराविक उपचार नाही. हे संकट कितीकाळ टिकेल सांगता येणे अवघड आहे. कदाचित आज जो कोरोना पॉझिटिव्ह आहे उद्या आपल्या मधील कोणी होईल. मग आपल्याला असा व्यवहार सहन होऊ शकेल का? नाही न... म्हणून एकमेकांशी सलोख्याचे वागा, त्यांना असे वाटू द्या की आपण सर्व एकत्रच आहोत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती