अक्षय कुमारच्या FAU-G गेमचा टीझर रिलीज

बुधवार, 28 ऑक्टोबर 2020 (12:45 IST)
FAU-G गेमची प्रतीक्षा संपली आहे. या गेमचा फर्स्ट लूक जारी झाला आहे. दसर्याच्या मुहूर्तावर या गेमचा टीझर रिलीज झाला आहे. अक्षय कुमारने सोशल मीडियावर FAU-G चा टीझर शेअर केला आहे. या टीझरच्या पहिल्याच सीनमध्ये गलवान खोर्यामत उड्डाण करणारे हेलिकॉप्टर दिसत आहे. हा गेम नोव्हेंबर महिन्यात लॉंच होणार आहे. टीझर शेअर करताना अक्षयने लिहिले आहे की, असत्यावर सत्याचा विजय असा आजचा दिवस आहे. निडर आणि एकतेचे प्रतीक असलेल्या फौजींसाठी जल्लोष साजरा करण्यासाठी यापेक्षा चांगला कोणता दिवस असू शकतो? दसर्याच्या या शुभ मुहूर्तावर फौजीचा टीझर सादर करत आहे. 
 
अक्षय कुमारने दोन महिन्यांपूर्वी या गेमची घोषणा केली होती. त्यावेळी अक्षय कुमारने म्हटले होते की, पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर अभियानाला पाठिंबा म्हणून हा अॅक्शन गेम सादर करताना मला अभिमान वाटत आहे. या मोबाइल गेममधून मिळणार महसुलाचा 20 टक्के  वाटा भारताच्या वीर ट्रस्टला दान केला जाणार आहे. केंद्र सरकारने अनेक चिनी अॅहप्स बॅन केली होती. यामध्ये पब्जी, टिकटॉकसारख्या अॅप्सचा समावेश आहे. या अॅ्पवर बंदी असली तरी मोबाइल आणि डेस्कटॉप व्हर्जन अजूनही उपलब्ध आहेत. केंद्राच्या निर्णयानंतर अक्षय कुमारने या गेमची घोषणा केली होती. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती