अयोध्या निकालावर तापसीने दिली 'ही' प्रतिक्रिया

शनिवार, 9 नोव्हेंबर 2019 (15:35 IST)
आज अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला. अयोध्यातील वादग्रस्त जागा ही हिंदूंची असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालानंतर सोशल मिडियावर प्रतिक्रिया येत आहेत. निकालाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री तापसी पन्नू हिने ट्विटरवर तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 
 
तापसीने ट्विटमध्ये म्हटले आहे की 'हो गया. बस. अब?' , अस म्हणत आता पुढे काय असा प्रश्न तापसीने विचारला आहे. या खटल्याची सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे झाली. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती