तमन्नाची कोरोनावर मात

शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020 (12:22 IST)
दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. तिची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. ही माहिती तमन्नाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. तिला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे ती हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार घेत होती. खरे तर मी आणि माझी संपूर्ण टीम योग्य काळजी घेत होतो. तरीदेखील मागच्या आठवड्यात मला ताप भरला. त्यानंतर मी माझी काळजी घेत कोरोनाची चाचणी देखील केली. त्यावेळी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. नंतर हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल झाले. रुग्णालयात योग्य काळजी घेतल्यानंतर आता माझे रिपोर्टस्‌ निगेटिव्ह आले असून मला डिस्चार्ज मिळाला आहे, असे तमन्ना म्हणाली. पुढे ती म्हणते, हा आठवडा त्रासदायक होता. मात्र, आता मला थोडे बरे वाटू लागले आहे. आशा आहे लवकरात लवकर मी ठणठणीत बरी होईन. सध्या  तरी मी स्वतःला क्वारंटाइनच करुन घेतले आहे.
 
काही दिवसांपूर्वी तन्नाने टि्वट करत तित्या आई-वडिलांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले होते. तिने पोस्टमध्ये तिच्या आई-वडिलांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवू लागल्यामुळे कोरोना चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले होते.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती