‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’चा टीझर झाला सोशल मीडियावर ट्रेण्ड

‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सुमारे २०० कोटींच्या बजेट असलेल्या या चित्रपटामध्ये महानायक अमिताभ बच्चन आणि दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती चिरंजीवी यांचा मुलगा रामचरण करत आहे. टीझर सोशल मीडियावर चांगलाच ट्रेण्ड झाला  आहे.
 
 विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांनी नरसिम्हा रेड्डी यांच्या गुरुची भूमिका साकारली आहे. या टीझरमध्ये चिरंजीवीसोबत अमिताभ बच्चन, किच्चा सुदीप, तमन्ना भाटिया हे कलाकार पाहायला मिळत आहेत.दरम्यान, हा चित्रपट कुरनूल येथे राहणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक नरसिम्हा रेड्डी यांच्या जीवनावर आधारित असून चिरंजीवी यात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर सुदीप याने अवुकू राजू हे व्यक्तीरेखा साकारली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती