लतादीदीचं ट्विट, मानले सगळ्याचे आभार

सोमवार, 9 डिसेंबर 2019 (10:25 IST)
प्रसिद्ध गायिका गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना 11 नोव्हेंबरला ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आता लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जवळपास 28 दिवसांनी त्यांच्या तब्येतीमध्ये चांगली सुधारणा झाली आहे. नुकतंच याबाबतच ट्विट लता मंगेशकर यांनी केले आहे. 
 
इतकंच नव्हे तर त्यांनी ट्विटरवरुन उपचार करणाऱ्या डॉक्टरच्या टीमचेही आभार मानले आहेत. “माझे ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टर खरोखर देव आहेत. रुग्णालयातील सर्व कर्मचारीही चांगले आहेत. मी तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते. हे प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम ठेवा,” असेही लता मंगेशकर यांनी म्हटलं आहे. 
 
दरम्यान लता मंगेशकर यांची 11 नोव्हेंबर रोजी अचानक तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यांच्यावर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर फारुख उदवाडीया यांच्या देखरेखीत उपचार सुरु होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती