Twitter वर पीएम मोदी यांचे फॉलोअर्सची संख्या पाच कोटी पार, वर्ल्ड टॉप-20 मध्ये एकटे भारतीय

सोमवार, 9 सप्टेंबर 2019 (16:29 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह राहतात. मग ते इंस्टाग्राम असो, लिंक्डइन असो, यूट्यूब किंवा ट्विटर असो. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मावर पीएम मोदी यांचे लाखो फॉलोअर्स आहे. तसेच आता ट्विटरवर सर्वात जास्त फॉलो करणार्‍यांच्या यादीत पीएम मोदी 20व्या क्रमांकावर आहे. सर्वात जास्त फॉलोअर्सच्या टॉप 20 लिस्टमध्ये पोहोचणारे पीएम मोदी एकटे भारतीय आहे.  
सोमवारी ट्विटरवर पीएम मोदी यांना फॉलो करणार्‍यांची संख्या 5 कोटीवर पोहोचली आहे. मोदी, अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंपहून किमान 1.4 कोटी मागे आहे, तसेच अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा 10.8 कोटी फॉलोअर्ससोबत पहिल्या क्रमांकावर आहे.  
 
केजरीवाल दूसर्‍या क्रमांकावर  
1 कोटी फॉलोअर्सच्या यादीत पीएम मोदी यांच्यानंतर भारतीय नेत्यांच्या लिस्टमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दूसर्‍या क्रमांकावर आहे. ट्विटरवर केजरीवाल यांना एक कोटी 54 लाख यूजर्स फॉलो करतात.  
 
तसेच एक कोटी 52 लाख फॉलोअर्ससोबत गृहमंत्री अमित शहा तिसर्‍या क्रमांकावर आहे. त्यांचे फॉलोअर्स 1 कोटी 52 लाखांपेक्षा जास्त आहे. या यादीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी एक कोटी सहा लाख फॉलोअर्ससह पाचव्या क्रमांकावर आहे.

 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती