हर्षवर्धन कपूरला अखेर ब्रेक मिळाला

बुधवार, 19 फेब्रुवारी 2020 (14:33 IST)
ऑलिम्पिक पदक विजेता अभिनव बिंद्राच्या बायोपिकला सुरुवात झाली आहे. हर्षवर्धन कपूरला या बायोपिकमधून ब्रेक मिळाला आहे. पप्पा अनिल कपूर यांच्याबरोबर हर्षवर्धनने या सिनेमाच्या कामाला सुरुवात केली असल्याचे प्यारी बहना सोनम कपूरने सोशल मीडियावर जाहीर केले आहे. तिने या सिनेमातील स्टारकास्टचा एक फोटोही शेअर केला आहे. त्यात अनिल कपूर, हर्षवर्धनसह अन्य कलाकार दिसत आहेत.
 
सर्वजण काळ्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. अभिनव बिंद्राच्या बायोपिकची घोषणा तीन वर्षांपूर्वीच झाली होती. अभिनव बिंद्राच्या मध्यवर्ती रोलमध्ये हर्षवर्धन प्रथमच पडद्यावर झळकणार आहे.
 
एकाचवेळी जागतिक आणि ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याची कामगिरी करणार्‍या अभिनव बिंद्राच्या कथेला या सिनेमातून पडद्यावर मांडले जाणार आहे. अभिनव बिंद्राने 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवले होते. त्यापूर्वी 2006 मध्ये 'आयएसएसएफ' वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशीपमध्येही त्याने विजयी कामगिरी केली होती. अशी दुहेरी विजेतेपदाची कामगिरी करणारा आतापर्यंतचा एकमेव भारतीय नेमबाज आहे. नेमबाजी या क्रीडा प्रकारामध्ये ऑलिम्पिकचे पदक मिळवण्याचा मान त्याने प्रथमच देशाला मिळवून दिला आहे. सोनमने त्याच्या अगोदर बॉलिवूडमध्ये स्थान पक्के केले आहे. तर हर्षवर्धनला आता ब्रेक मिळाला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती