हर्षवर्धन पाटील यांची कुटुंबासह मुख्यमंत्र्याना भेट

माजी मंत्री आणि काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चां रंगली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेल्या 'विधानगाथा' पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी पाटील यांनी आपल्या कुटुंबासह मुख्यमंत्र्याची भेट घेतली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता जिल्हा परिषद सदस्य झाल्यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदनही केलं. 
 
या भेटीवर हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं की, 'मी लिहिलेल्या विधानगाथा या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. देवेंद्र फडणवीस आमदार असताना त्यांनी अर्थसंकल्पावर लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी त्यांनी मला संसदीय कामकाज मंत्री म्हणून निमंत्रण दिलं होतं. हा कार्यक्रम आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही. हा सर्वपक्षीय कार्यक्रम आहे, मुख्यमंत्र्यांबरोबर शरद पवार आणि मी ज्या मुख्यमंत्र्यांबरोबर काम केलं त्या सगळ्यांना या कार्यक्रमाला निमंत्रित केलं आहे.'

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती