भूमी भावणार्‍या भूमिकाच स्वीकारते

सोमवार, 16 मार्च 2020 (11:03 IST)
माझ्या मनाला ज्या भावतात अशाच भूमिका मी आजवर स्वीकारल्या. मला आनंद आहे की, या सर्व भूमिाक प्रेक्षकांना आवडल्या, असं अभिनेत्री भूमी पेडणेकर म्हणाली. गेल्या वर्षी भूमीनं 'सांड की आँख', 'बाला' आणि 'पती पत्नी और वो' असे एकापाठोपाठ एक हिट सिनेमे दिले. त्याबद्दल तिनं सिनेरसिकांचे आणि समीक्षकांचेही आभार मानले.
 
'बॉलिवूडमधल्या नामांकित व्यक्ती मला आपल्या चित्रपटात सहभागी करून घेतात, याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. त्याचबरोबर सिनेरसिकांचेही मी आभार मानते. कारण, त्यांच्या सपोर्टशिवाय कोणताही कलाकार यशस्वी होऊ शकत नाही,' असं भूमी म्हणाली. 'दुर्गावती' आणि 'डॉली किट्टी और वो चमकते सितारे' हे भूमीचे चित्रपट लवकरच रिलीज होणार आहेत, तर करण जोहरच्या 'तख्त'चं शूटिंग ती लवकरच सुरू करणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती