ओह! सई ताम्हणकरच आहे 'सविता भाभी'

सोमवार, 17 फेब्रुवारी 2020 (18:25 IST)
सविता भाभी… तू इथंच थांब!! या होर्डिंर्गचे गुपित उलगडले आहे. यातील सविता भाभी सई ताम्हणकर आहे कळल्यावर तिच्या आगामी ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटाची उत्सुकता अजूनच वाढली आहे. या चित्रपटात सई सविता भाभी ही भूमिका साकारत आहे. 
 
या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे आणि सविता भाभी या रहस्यावरून पडदा उठला आहे. ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या नावाचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटी येत आहे. चित्रपटाच्या नावावरूनच नेमकं काय बघायला मिळणार आहे याची उत्सुकता होती मात्र त्याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. 
 
चित्रपटात अभय महाजन, पर्ण पेठे आणि सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत सायली पाठक, अक्षय टांकसाळे, ऋतुराज शिंदे, केतन विसाळ, विराट मडके, अमेय वाघ देखील दिसणार आहे. आलोक राजवाडे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. ट्रेलरच्या सुरुवातीलाच सईची मादक आवाज ऐकू येते. 
 
ट्रेलरने कथेविषयीची उत्सुकता निर्माण केली आहे कारण यात सिनेमाची कहाणी उलगडलेली नाही. येत्या 6 मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती