‘नि:शब्दम’ चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित

गुरूवार, 12 सप्टेंबर 2019 (10:12 IST)
अभिनेत्री अनुष्का शेट्टीच्या आगामी ‘नि:शब्दम’ चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित झाला आहे. नि:शब्दममध्ये अनुष्का ‘साक्षी’ या भूमिकेत दिसणार आहेत. नि:शब्दम तेलुगू, तामिळ, हिंदी आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नि:शब्दम् चित्रपटाद्वारे आर. माधवन म्हणजेच रंगनाथन माधवन आणि अनुष्का शेट्टी यांची जोडी ‘रेंडू’ नंतर पुन्हा एकत्र येणार आहे. अनुष्का शेट्टी आणि आर. माधवन शिवाय या चित्रपटात अभिनेत्री अंजली, शालिनी पांडे, माइकल मॅडसन आणि सुब्बाराजू सारखे मोठ-मोठे कलाकार आहेत. 
 
नि:शब्दमचे दिग्दर्शन हेमंत मधुकर करणार आहेत, तर निर्मिती कोना वेंकट यांच्या कोना फिल्म फॅक्टरी या निर्मिती संस्थेद्वारे केली आहे. अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्या आगामी ‘नि:शब्दम’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती