सगळीचं रसायनं चांगली नसतात - मुख्यमंत्र्यांना सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर

बुधवार, 28 ऑगस्ट 2019 (11:57 IST)
गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे काही दिग्गज नेते भाजपत प्रवेश करत आहेत. या पक्षप्रवेशांवरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगला आहे.  
 
सुप्रिया सुळेंच्या 'वॉशिंग पावडर'ला मुख्यमंत्र्यांनी 'डॅशिंग पावडर' असं प्रत्युत्तर दिले होते. यावर सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं.
 
मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे 'डॅशिंग केमिकल' असल्याचं म्हटलं आहे. पण सर्वच रसायनं चांगली नसतात, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. मी सायन्सची विद्यार्थिनी आहे. त्यामुळे रसायनांची मला चांगली माहिती आहे, असंही त्यांनी म्हटलं.
 
नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी पक्ष सोडून जाणाऱ्यांनाही त्यांनी इशाराही दिला. 'भाजपवाले रसायनांची पावडर टाकत आहेत. रसायनातून काय-काय होतं, तुम्हाला माहीत आहे. त्यामुळं सांभाळून राहा,' असं त्यांनी म्हटलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती