सुषमा स्वराज यांच्या निधनाने खासदार सुप्रिया सुळेंनीही हळहळ व्यक्त केली

बुधवार, 7 ऑगस्ट 2019 (11:43 IST)
उत्तम वक्‍त्या, अजातशत्रू राजकारणी आणि सहृदय व्यक्‍ती अशा देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. सुषमा स्वराज यांच्या निधनाने खासदार सुप्रिया सुळेंनीही हळहळ व्यक्त केली आहे.
 
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माजी परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्‍कादायक आहे. सुषमाजी यांच्या जाण्याने अभ्यासू, कर्तृत्ववान नेतृत्त्व देशाने गमावले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे, अशी भावना व्यक्त केली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती