मोहन डेलकर: दादरा नगर हवेलीचे खासदार डेलकर यांचा मृत्यू, आत्महत्येचा संशय

सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (19:05 IST)
दादरानगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली आहे. डेलकर यांचा मृतदेह मुंबईतील मरीन ड्राइव्हवरील सी-ग्रीन हॉटेलमध्ये आढळून आला.
 
मोहन डेलकर दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार होते.
 
मुंबई पोलिसांनी सोमवारी दुपारी त्यांचा मृतदेह सी-ग्रीन हॉटेलमधून ताब्यात घेतला. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आल्याची माहिती, पोलिसांनी दिलीये.
 
याबाबत बोलताना अतिरिक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी म्हणाले, "मोहन डेलकर यांचा मृतदेह हॉटेलमध्ये आढळून आला. याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. आत्महत्येचं कारण काय याबाबत अजूनही ठोस माहिती नाही."
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे. ही नोट गुजराती भाषेमध्ये लिहिण्यात आली आहे.
साभार ट्विटर 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती